11:03 AM, 12th May
ठाणे जिल्ह्यात भीषण आगीत १५ गोदामे जळून खाक
ठाणे जिल्ह्यातील एका गावात रविवारी रात्री लागलेल्या आगीत किमान १५ गोदामे जळून खाक झाली. यापैकी काही गोदामांमध्ये पेट्रोलियम उत्पादने देखील साठवली जात होती. भिवंडीतील वडपे गावात पहाटे ३ वाजता लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे (बीएनएमसी) अग्निशमन अधिकारी महेश पाटील यांनी दिली.