मुंबईत एका इमारतीला भीषण आग,अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी हजर

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:56 IST)
मुंबईतील कांजूरमार्ग परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली आहे. विक्रोळी कांजूरमार्ग परिसराच्या पूर्वेला असलेल्या एनजी रॉयल पार्क परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
11 मजली इमारतीच्या नवव्या आणि दहाव्या मजल्यावर आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व परिसरात असलेल्या या इमारतीला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आहे. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

<

#WATCH महाराष्ट्र: मुंबई के कांजुरमार्ग में एनजी रॉयल पार्क इलाके में लेवल 2 में आग लग गई। मौके पर करीब 10 दमकल की गाड़ियां मौजूद हैं। pic.twitter.com/FfyVmo2FSr

— ANI_HindiNews (@AHindinews) February 28, 2022 >मिळालेल्या माहितीनुसार, ही आग दुपारी एक वाजता लागली. अग्निशमन दलाने याचे वर्णन लेव्हल 2 ची आग असे केले आहे. दुपारी 1.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. पंधरा ते वीस मिनिटांत अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले.
 

संबंधित माहिती

पुढील लेख