विशेष म्हणजे रविवारी मुंबईत पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. याआधी मुंबईत 15,16,17 , 20 , 23, 25 आणि 26 फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. त्यानंतर आज पुन्हा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे या महिन्यात आठव्यांदा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे.
दरम्यान याआधी गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये 7 वेळा मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झालेली होती.तिसरी लाट सुरू झाल्यानंतर 2 जानेवारीनंतर दि. 15 फेब्रुवारी रोजी मुंबईत शून्य मृत्युची नोंद झाली होती. तर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडचा पहिला रुग्ण हा मार्च २०२० मध्ये आढळून आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद महानगरपालिका क्षेत्रात झाली होती.