मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आझाद मैदानावर उपोषण

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (10:03 IST)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती मुंबईतील आझाद मैदानावर आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यात त्यांनी आमरण उपोषण करण्याची माहिती दिली होती. 

संभाजीराजे हे आज 11:30 वाजता उपोषणस्थळी आझाद मैदान येथे पोहोचणार त्यानंतर आंदोलनाला सुरुवात होण्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या या आंदोलनाला अनेक ग्राम पंचायत, संघटना, शहर तालुका, बहुजन समाजातील लोकांचा पाठबळ मिळत आहे. 

संभाजीराजे उपोषणाला एकटे बसणार असले तरी त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळत आहे. 
मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संभाजी राजे 11:30 वाजे पासून उपोषणाला बसणार आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून सूचित केले होते. 

या आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवाना पोलीस प्रशासनाने अडवू नये अशी मागणी करत ट्विट केले आहेत. 
संभाजी राजे छत्रपती सर्वप्रथम 10:50 वाजता संभाजी राजे हुतात्मा चौकात स्मारकास अभिवादन करून आझाद मैदान आंदोलन स्थळी पोहोचतील. नंतर प्रसार माध्यमाशी संवाद साधणार आहे. नंतर संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून 11:30 वाजेपासून उपोषणाला सुरुवात होणार आहे.  या आंदोलनाबाबतची ठराव पत्रे सर्व मराठा समाजाकडे पाठविण्यात आली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती