बटाटा हा सर्वांनाच माहिती आहे बटाट्याचे अनेक पदार्थ आहे जे सर्वांना आवडतात पण तुम्ही कधी बटाट्याचे लोणचे खाल्ले आहे का? नसेल ट्राय केले तर ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल चटपटीत बटाट्याचे लोणचे, तर चला जाणून घ्या रेसिपी
साहित्य-
अर्धा किलो उकडलेले बटाटे
तीन चमचे मोहरीचे तेल
चिमूटभर हिंग
एक चमचा जिरे
अर्धा चमचा डाळ
एक बारीक कापलेला कांदा
दोन बारीक चिरलेली मिरची
किसलेले आले
अर्धा चमचा लाल तिखट
एक हळद
एक चमचा धणे पूड
अर्धा गरम मसाला
दोन चमचे लिंबाचा रस
कृती-
सर्वात आधी पॅनमध्ये मोहरीचे तेल गरम करावे व यामध्ये हिंग, मोहरीची डाळ, जिरे घालावे आता त्यामध्ये कांदा आणि मिरची घालून परतवून घ्यावे तसेच नंतर आले, लाल तिखट, हळद, धणे पूड, गरम मसाला घालावा व हे मिश्रण चांगल्या प्रकारे परतवून घ्यावे आता यामध्ये उकडलेले बटाटे सोलून घालावे व नंतर लिंबाचा रस घालावा व परत हे मिश्रण हलवून घ्यावे आता दोन मिनिट तसेच ठेऊन गॅस बंद करावा व थंड होऊ द्यावे तर चला तयार आहे आपले बटाट्याचे लोणचे, हे लोणचे तुम्ही एयर टाइट कंटेनर मध्ये स्टोर करू शकतात तसेच पोळी, पराठा यासोबतच नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.