कुरकुरीत आळूच्या पानाचे पकोडे

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (16:04 IST)
साहित्य-
आळूची पाने 
बेसन-2 वाटी 
लसूण -7 ते ८
कांदे -2 चिरलेला 
हिरवी मिरची -3 ते ४
हळद -1/2 चमचा 
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
पाणी गरजेनुसार 
 
कृती-
सर्वात आधी एका बाऊलमध्ये सर्व मसाले एकत्रित करून घ्यावे. आत त्यामध्ये थोड्या प्रमाणात पाणी घालून घट्ट मिश्रण बनवा. आता एका पॅनमध्ये पाणी गरम करावे. आता प्रत्येक अळूच्या पानावर बेसन लावावे. आता एक पान दुसऱ्याच्या वर ठेवा आणि त्याला गोल करा. प्रत्येकी 4 पानांचे 2-3 संच बनवावे. तसेच आळूच्या पानांचे गोळे करून घ्या.आता हे पकोडे स्टीलच्या चाळणीवर ठेवा आणि गरम पाण्याच्या पातेल्यात ठेवा. तसेच प्लेटने झाकून वाफवून घ्या. आळूच्या पानांना 15 ते 20 मिनिट वाफवावे. आता ते एका प्लेटमध्ये काढून चाकूने गोल कापून तेलात तळून घ्या. तर चला तयार आहे आपले आळूच्या पानाचे पकोडे, आता एका प्लेटमध्ये काढा व सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती