भारतात अनेक घरांमध्ये रात्री जेवणात डाळ बनवली जाते. तसेच या डाळीसोबत अनेक जणांना तोंडी लावायला कोरडी भाजी लागते. म्हणून आज आपण अश्याच कोरड्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. बाजारात कारले सहज उपलब्ध होते. याच कारल्यापासून आपण कुरकुरीत कारले चिप्स बनवणार आहोत तर चला जाणून घ्या कुरकुरीत कारले चिप्स रेसिपी.
साहित्य-
कारले
बेसन
तांदळाचे पीठ
हळद
गरम मसाला
आमसूल पावडर
चाट मसाला
तिखट
मीठ
कृती-
कारल्याचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी कारले कापून त्याचे बारीक गोल आकाराचे काप करून घ्या. मग मीठ लावून स्वच्छ पाण्याने धुवून कापडावर वाळत घालावे. कारल्याचे पाणी वाळल्यानंतर त्यावर 2 चमचे बेसन टाकावे. व एका चमचा तांदळाच पीठ टाकावे. आता हळद, गरम मसाला आणि मीठ घालावे.
यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्यांमध्ये हे कारले तळून घ्यावे. व कुरकुरीत होइसपर्यंत तळून घ्यावे.
आता तळेलेले कारले पेपरवर ठेवावे. आता यावर आमसूल पावडर, चाट मसाला, तिखट घालावे. तर चला तयार आहे आपले कुरकुरीत कारले चिप्स रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.