Crispy Recipe : मेथी पुरी

रविवार, 3 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
दोन कप गव्हाचे पीठ 
1/4 कप बेसन  
दोन चमचे कसुरी मेथी 
एक कप ताजी मेथी पाने 
अर्धा चमचा जिरे 
अर्धा चमचा तिखट 
1/4 चमचा हळद 
चवीनुसार मीठ 
तेल 
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ आणि बेसन घ्यावे. यानंतर या पिठामध्ये कसुरी मेथी, बारीक चिरलेली ताजी मेथी, ओवा, जिरे, तिखट, हळद आणि मीठ घालावे. आता या मिश्रणात एक चमचा तेलाचे मोहन घालावे. आता या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. तसेच 10-15 मिनिटे पीठ झाकून ठेवावे. 
कणिक तयार झाल्यावर त्याचे छोटे गोळे बनवून घ्यावे. आता पुरी लाटून घ्यावी व तेलामध्ये तळून घ्यावी. तर चला तयार आहे आपली कुरकुरीत अशी मेथीची पुरी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती