डिनर स्पेशल मटर पुलाव

सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (12:36 IST)
साहित्य- 
1.5 कप- बासमती तांदूळ  
1 कप- मटार 
2 - वेलची 
3 - लवंगा 
1 - तमालपत्र 
1 - चमचा जिरे  
2 - चमचे आले लसूण पेस्ट 
2 - हिरवी मरची मधून कापलेली  
2 - चमचे बारीक चिरलेला पुदिना 
2 - चमचे कोथिंबीर 
1 - चमचा गरम मसाला 
1 - काप बारीक चिरलेला कांदा 
1 - चमचा मेथीची पाने  
2 - चमचे तूप
चवीनुसार मीठ 

कृती-
सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालावा. नंतर त्यामधील पाणी काढून घ्यावे. आता एक कुकर घेऊन त्यामध्ये तूप घालून जिरे घालावे. मग यामध्ये सर्व मसाले तमालपत्र, लवंग आणि वेलची घालावी.  सुगंध येईसपर्यंत परतवून घ्यावे. मग यामध्ये कांदा आणि मिरची घालावी. आता हे परतवल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, पुदिना आणि कोथिंबीर घालावी. तसेच आता यामध्ये मटार घालून परतवून घ्यावे. यानंतर तांदूळ, गरम मसाला, मेथीची पाने घालून परतवून घ्यावा. मग यामध्ये पाणी आणि मीठ घालावे.कुकरचे झाकण लावल्यानंतर एक शिट्टी घ्यावी व गॅस मध्यम करावा. व पाच मिनिट नंतर गॅस बंद करावा. कुकर थंड झाल्यानंतर त्याचे झाकण उघडावे आणि त्यामध्ये वरून कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपला गरमागरम मटार पुलाव. डिनर करीत नक्कीच ट्राय करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती