सर्वात आधी मटार सोलून घ्यावे. तसेच कुकरमध्ये थोडे मीठ घालून मटार वाफवून घ्यावे. आता कुकर थंड झाल्यावर मटार काढून घ्यावे व चाळणीच्या मदतीने मटारमधील पाणी काढून घ्यावे.तसेच मटार झाल्यावर मॅश करावे. आता कढईत तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून मटार घालावे. त्यानंतर त्यात कोथिंबीर, तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा आमसूल पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार मीठ घालून 10 मिनिटे मंद आचेवर परतवून घ्यावे. आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावे. तसेच आता मटर पराठा बनवण्यासाठी पीठ चांगले मळून घ्यावे. आणि त्यात थोडे मीठ घालावे. तसेच मळलेल्या पिठाचे गोळे बनवून घ्यावे. आता मटारचे मिश्रण भरून त्याचा गोल गोळा बनवा. गोळा हलक्या हाताने लाटून घ्यावा. आता लाटलेला पराठा तव्यावर भाजून घ्यावा. बटर किंवा तूप लावून शेकून घ्यावा. तर चला तयार आहे आपला मटार पराठा रेसिपी जी हिवाळ्यात अतिशय पौष्टिक आहे. हा पराठा तुम्ही लोणचे, चटणी किंवा सॉस सोबत नक्कीच सर्व्ह शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.