दोन मोठे चमचे लिंबाचा रस
अर्धा छोटा चमचा हळद
शुगर सिरप
कृती-
आवळा कँडी बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर आवळे चिरून घेऊन त्यामधील बिया काढून घ्यावा. आता एका भांड्यात पाणी उकळून त्यात आवळा घालावे. आता 10 मिनिटे उकळून घ्यावे. नंतर आवळे बाहेर काढून थंड करावे. आता एका कढईत एक कप पाणी आणि साखर घालून उकळून घ्यावे. साखर पूर्णपणे विरघळली आणि पाक तयार झाला की हिंग, मिरे पूड, हळद आणि मीठ घालावे. आता हे मिश्रण 5 मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे ते घट्ट होईल. सिरप तापमान थोडे थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस घालावा. उकडलेले आवळे सिरपमध्ये घालावे. व मिक्स करावे. तसेच 5 मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे जेणेकरून आवळा सरबत शोषून घेईल आणि चव येईल. आता आवळा कँडी बाहेर काढा आणि नीट वाळण्यासाठी प्लेट किंवा ट्रेमध्ये ठेवावी. तसेच 2 दिवस सूर्यप्रकाशात वाळवण्यासाठी ठेवावी. तर चला तयार आहे आपली आवळा कँडी.