सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून २-३ शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यावे. तसेच हे आवळे थंड झाल्यावर यामधून बिया वेगळ्या करून घ्यावा. आता हे आवळे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. आता कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे. आता त्यात हिंग, बडीशेप आणि चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता मॅश केलेले आवळे घालावे.व त्यातील पाणी आटू द्यावे. नंतर वरील मसाला साहित्य घालून चांगले मिक्स करावे व थोडा वेळ मंद आचेवर षिजवावे. आवळा लौंजी तेल सोडू लागल्यावर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली आवळा लौंजी रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.