अनेकांना लोणची हा पदार्थ अगदी मनापासून आवडतो. तसेच लोणच्याचे अनेक प्रकार आहे. त्यापैकी आज आपण गाजराचे चटपटीत लोणचे पाहणार आहोत. जे चवीला अगदी स्वादिष्ट लागते. तर चला जाणून घ्या रेसिपी
साहित्य-
गाजर - 1 किलो
मोहरीचे तेल -1 कप
तिखट - 1 चमचा
हळद - 1/2 चमचा
आमसूल पावडर - 1 चमचा
मीठ - चवीनुसार
कृती-
सर्वात आधी गाजर स्वच्छ धुवून सोलून घ्यावे व उभ्या आकारात छोटे छोटे त्याचे तुकडे करावे. आता मोहरीचे तेल तिखट, हळद, आमसूल पावडर, मीठ घालून बारीक वाटून द्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे गरम तेलात गाजराचे तुकडे घालून परतवून घ्यावे. आता हे तुकडे बनवलेल्या मिश्रणामध्ये चांगले मिक्स करावे. तसेच गाजराचे हे मिश्रण एका डब्ब्यात भरावे व झाकण लावून ठेवावे कमीत कमी एक आठवडा असेच ठेवावे ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे मुरेल आणि त्याची चव चटपटीत लागेल. तर चला तयार आहे आपले गाजराचे लोणचे, जे तुम्ही पराठा, पोळी, खिचडी यांसोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.