Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक गुलाम त्याच्या मालकाकडून सतत होणार छळ सहन न झाल्याने जंगलात पळून जातो. जंगलात एक सिंह त्याला दिसतो. सिंह वेदनेने व्याकुळ झालेला असतो. गुलाम जवळ जाऊन पाहतो तर सिंहाच्या पंजात काटा रुतल्याने त्याला वेदना होत असताना. गुलाम धाडसाने पुढे येतो आणि हळूवारपणे काटा काढतो. सिंह त्याला इजा न करता निघून जातो.
तसेच काही दिवसांनी, गुलामाचा मालक जंगलात शिकार करायला येतो आणि अनेक प्राण्यांना पकडतो आणि त्या सिंहाला पकडतो. गुलामाला मालकाचे लोक पाहतात आणि ते त्याला पकडून क्रूर मालकाकडे घेऊन जातात. आता मालकाने गुलामाला सिंहाच्या पिंजऱ्यात टाकण्यास सांगितले. पिंजऱ्यात असलेला गुलाम त्याच्या मृत्यूची वाट पाहत असतो पण सिंह त्याला खात नाही. जेव्हा त्याला कळते की हा तोच सिंह आहे ज्याला त्याने मदत केली होती. यांनतर गुलाम सिंह आणि सर्व प्राण्यांना पिंजऱ्यातून मुक्त करतो.