कृती-
सर्वात आधी घेवड्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्या. तसेच हातानेच या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करायचे. तसेच सुरीने देखील कापू शकता पण घेवड्याच्या शेंगा हाताने तुडल्याने भाजीची चव चांगली लागते. आता सर्व तुकडे पाण्यात भिजत घालावे. नंतर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद घालावी. आता मिरची तुकडे घालून परतवून घ्यावे.तसेच तिखट आणि गोडा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. आता बटाटा काप घालावे. व आता शेंगांचे तुकडे घालून परतवून घ्यावे. व थोडावेळ झाकून ठेवावे. नंतर चवीनुसार मीठ घालून थोडे पाणी घालावे जेणेकरून वाफेने शेंगा शिजतील. आता यामध्ये चवीनुसार साखर किंवा गूळ घालावा. तसेच खोबरे किस आणि गरम मसाला घालावा व वरून कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपली दत्तगुरुंना आवडणारी घेवड्याची भाजी, नैवेद्यात देखील ठेऊ शकतात.