सर्वात आधी तुरीची डाळ स्वच्छ धुवून हळद आणि पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. आता कढईत तेल घालावे. त्यामध्ये जिरे घालावे मग लसूण आणि शेंगदाण्याचे कूट घालून हलके तपकिरी होईपर्यंत परतवून घ्यावे. आता त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यावा. यानंतर टोमॅटो आणि हिरवी मिरची घालावी. नंतर ताक आणि वरील सर्व मसाले घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा. आता यामध्ये चिरलेला पालक घालावा आणि 5 मिनिटे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा. तसेच या मिश्रणात आता शिजवलेली डाळ घालावी. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून पातळ करावी. आता यामध्ये मीठ घालून लिंबाचा रस घालावा. नंतर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली ताकातील पालकाची भाजी, गरम पोळी, भात किंवा पराठ्यासोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.