एका मोठ्या भांड्यात मैदा घ्यावा. तसेच त्यामध्ये तूप आणि मीठ घालावे व मिक्स करावे. आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. तसेच पीठ 20 मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे व हिंग घालावे. यानंतर आले-हिरवी मिरची पेस्ट घालून परतून घ्यावी. आता त्यात मिक्सरमध्ये जाडसर दळलेले मटार घालून मध्यम आचेवर पाच मिनिटे परतून घ्यावे. तसेच बडीशेप, धणेपूड, तिखट, गरम मसाला, आमसूल पावडर आणि मीठ घालावे. आता हे परतवून घ्यावे. आता आपले सारण तयार आहे. मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे. आता एक गोळा घेऊन त्यामध्ये मटारचे सारण भरावे व कचोरीचा आकार द्यावा. आता पॅनमध्ये तेल गरम करावे. कचोऱ्या मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा. तर चला तयार आहे आपली गरमागरम कुरकुरीत मटार कचोरी हिरव्या कोथिंबीर चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.