सोनपापडीची गोड पुरी बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये सोनपापडी घालावी. तसेच
यामध्ये वेलचीपूड आणि तीळ घालावे. आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. आता हे गव्हाच्या पिठामध्ये घालावे व आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करावे. तसेच पीठ मळून बाजूला ठेऊन द्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. आता गोळे बनवून कचोरीचा अकरा द्यावा. यानंतर तेलामध्ये तळून घ्यावा. तर चला तयार आहे आपली सोनपापडीची गोड पुरी, गरम किंवा थंड सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.