चविष्ट आलू जलेबी

सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (07:18 IST)
आता पर्यंत आपण रव्याची,मैद्याची जलेबी बनवली असणार, आज आम्ही आलूची जलेबी ची रेसिपी सांगत आहोत. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या. 
 
साहित्य- 
तीन ते चार बटाटे, एक कप दही, एक कप आरारूट,एक कप साखर,केसर कांड्या,वेलचीपूड,गुलाबपाणी,तूप तळण्यासाठी.
 
कृती -
आलू जलेबी बनविण्यासाठी सर्वप्रथम केसरला गुलाबपाण्यात मिसळा.साखरेची एकतारी चाशनी बनवून केसर आणि वेलची पूड मिसळून द्या .बटाटे उकळवून सोलून मॅश करून घ्या. या मध्ये दही ,आरारूट मिसळून बटाट्याच्या सारणाचे पातळ घोळ तयार करा. पिशवीत किंवा बाटलीत घोळ भरून जलेबीचा आकार द्या आणि कढईत तूप तापत ठेवून जलेबी तळून घ्या .साखेरच्या पाकात जलेबी पाच ते सात मिनिटे बुडवून ठेवा नंतर खाण्यासाठी सर्व्ह करा.     
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती