आई वडिलांमध्ये मतभेद झाले असल्यास मुलांनी या टिप्स अवलंबवा

Webdunia
बुधवार, 30 जून 2021 (08:40 IST)
लग्न  झाल्यावर प्रत्येक जोडप्याचे काही स्वप्न असतात.की ते आपल्या लग्नाच्या या नात्याला चांगले निभावणार,त्यांच्या मध्ये कधीही भांडणे होणार नाही.मतभेद, रुसवे,फुगवे होणार नाही.नवरा बायकोच नातं विश्वासावर अवलंबवून असतं.या विश्वासाला तडा गेल्यावर नातं तुटायला वेळ लागत नाही.
 
या नात्यात जेवढे प्रेम आहे तेवढेच भांडणे देखील असतात.परंतु हे भांडणे विकोपाला गेल्यावर नातं दुरावू शकत.बऱ्याच वेळा असं दिसून आले आहे की भांडणे झाल्यावर किंवा मतभेद झाल्यावर जोडपे एकमेकांशी अबोला धरतात असं करू नये.घरात झालेल्या भांडणाचा मुलांवर देखील परिणाम होतो.नेहमीच भांडणे होत असतील तर मुलांना मध्ये पडावंच लागतं.
 
मुलांनी आपल्या आई वडिलांचे भांडण मिटविण्यासाठी काही टिप्स अवलंबवावे जेणे करून आई वडिलांचे भांडणे संपतील आणि त्यांच्या मधील प्रेम पुन्हा वाढेल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 दोघांना एकमेकांचे महत्त्व सांगून-भांडण झाल्यावर नवरा बायको एकमेकांशी अबोला धरतात.दोघांमधील अबोला कसा दूर करतात येईल या साठी मुलांनी आई वडिलांना एक मेकांचे महत्त्व सांगावे.वडिलांना आईचे महत्व सांगा की कशी आई आपल्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देते.आणि आई ला वडिलांचे महत्त्व सांगा की कसे बाबा आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात.अशा पद्धतीने एकमेकांचे महत्त्व समजवून द्या.जेणे करून ते राग विसरून पुन्हा एकत्र होतील.
 
2 दोघांची बोलणी करवून-मतभेद झाल्यावर पती-पत्नीमध्ये अबोला होतो.म्हणून मुलांनी अशा परिस्थितीत त्यांचे भांडण संपवून त्यांना एकत्र आणावे.त्यांना एकमेकांशी बोलायला लावावे जेणे करून त्यांच्या मधील भांडणे संपतील.
 
3  कँडल लाईट डिनर ने-आई वडिलांचे भांडण संपविण्याची एक युक्ती कँडल लाईट डिनर देखील असू शकते.मुलं आई-वडिलांसह त्यांच्या साठी कँडल लाईट डिनरची व्यवस्था करू शकतात.असं केल्याने दोघातील भांडण संपून एकमेकांमधील प्रेम वाढेल.
 
4  वेळ देऊन - बऱ्याच वेळा भांडण एवढे वाढतात की त्यांना एकटे राहू द्यावे. मुलांनी त्यांना थोडा वेळ द्यावा असं केल्याने त्यांना वाटेल की आपण उगाचच शुल्लक कारणांवरून भांडण करत होतो.त्यांच्या मधील भांडण संपतील आणि ते पुन्हा एकत्र येतील.
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख