रत्नागिरीत 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण,तिन्ही बालकांची डेल्टाप्लसवर मात

मंगळवार, 29 जून 2021 (15:32 IST)
रत्नागिरीत  3 बालकांना डेल्टा प्लसची लागण झाल्यांचे समोर आले आहे. दरम्यान, या तिन्ही बालकांनी डेल्टाप्लसवर मात केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील केवळ एका मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण सापडले आहेत. पहिला रुग्ण हा रत्नागिरीत सापडला आहे. तसेच पहिला बळी रत्नागिरीत गेला आहे.
 
भारतात सापडलेल्या कोरोना डेल्टा प्लस व्हायरसचा अख्ख्या जगालाच धोका आहे. तर धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे एकूण 21 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, रत्नागिरीत संगमेश्वरमध्ये पहिला बळी गेला. डेल्टा प्लसची लागण एका महिलेल्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संगमेश्वरमधील तीन गावांना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले असून येथे कंन्टेमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती