मूळव्याधीच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी हे आसन नियमित करावे

शुक्रवार, 25 मार्च 2022 (16:16 IST)
मूळव्याधीच्या त्रास खूप वेदनादायक असतो. हा हळू हळू व्यक्तीला कमकुवत बनवतो. आजच्या बदलत्या जीवनशैली आणि योग्य आहार न घेतल्यामुळे बद्धकोष्ठता आणि मुळव्याधाचा त्रास होतो. प्रत्येक वेळा शस्त्रक्रिया करावी लागणार असे काही नाही. या रोगाकडे दुर्लक्ष न करता जर आपण नियमितपणे योग्य योगासन केले तर या रोगापासून मुक्ती मिळवू शकतो. चला तर मग या साठी कोणते आसन आहे जाणून घेऊ या.
 
1  पवनमुक्तासन- पोटासाठी केल्या जाणाऱ्या आसनामध्ये हे सर्वात चांगले आसन आहे. हे पोटाची गॅस काढण्यासाठी केले जाते. मूळव्याधीच्या त्रासाचे मुळापासून नायनाट करण्यासाठी हे आसन करणे खूप फायदेशीर आहे. जर आपल्याला देखील मूळव्याधीचा त्रास आहे तर आपल्यासाठी हे आसन करणे फायदेशीर आहे. असं केल्याने आपले हे त्रास काहीच दिवसात बरे होतील.
 
2 बालासन - हे सोपे आसन आहे. हे केल्याने बरेच फायदे मिळतात.हे केल्याने शरीरातील रक्तविसरण चांगले होते आणि कंबरेच्या वेदनेत देखील आराम मिळतो. हे आसन केल्याने गॅस, ऍसिडिटी, आणि बद्धकोष्ठताचा त्रास नाहीसा होतो .बद्धकोष्ठता दूर झाल्यामुळे मुळव्याधाचा त्रास देखील बरा होतो. कुल्ह्याच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी बालासनाचा सराव केला पाहिजे.
 
3 सर्वांगासन- मूळव्याधीच्या सुरवातीच्या काळातच जर आपण सर्वांगासन करता तर हा त्रास लवकर बरा केला जाऊ शकतो. हे आसन केल्याने शरीराच्या सर्वांगाचा व्यायाम होतो. परंतु मूळव्याधीच्या रुग्णांनी हे आसन करताना लक्षात ठेवा की पाय झटक्याने वर नेऊ नका. हळू हळू आपल्या शरीराच्या क्षमतेनुसारच या आसनाचा सराव करावा. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती