राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिक आणि बीड विजयी; नाशिकच्या व्यंकटेश बेहरेची अष्टपैलू चमक

मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (21:56 IST)
नाशिकयेथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात ,हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिक ने स्टार , पुणे विरुद्ध सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. तर एस एस के क्रिकेट मैदानावर बीडने नंदुरबारवर १ डाव व ६३ धावांनी मोठा विजय मिळवला.
 
पहिल्या सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून नाशिक ने स्टार , पुणेला फलंदाजी साठी आमंत्रित केले व १४४ धावांत रोखले. नाशिकच्या हुजेफा मर्चंट व देवांश गवळी ने प्रत्येकी ३ गडी बाद केले. उत्तरादाखल ९ बाद १३९ वरुन सातव्या क्रमांकावरील व्यंकटेश बेहरेच्या नाबाद ५५ व मंथन पिंगळे १९ यांच्या ४६ धावांच्या भागीदारीने नाशिकने ५१ धावांची आघाडी मिळवली. स्टार च्या आर्यन घोडके ने ५ बळी घेतले. ज्ञानदीप गवळी ने ३५ व कर्णधार आरुष रकटे ने २४ धावा केल्या. दुसऱ्या डावात स्टारने झिदान मंगा ६५ व शाश्वत पांड्या ३५ यांच्या जोरावर १७० पर्यंत मजल मारली.
 
दुसऱ्या डावा त हि देवांश गवळीने परत ३ व सायुज्य चव्हाण ने हि ३ गडी बाद केले. निर्णायक विजयासाठी नाशिकला २५ षटकांत १२० धावांचे लक्ष्य होते. व्यंकटेश बेहरेच्या नाबाद ३८ व चिन्मय भास्करच्या ३१ तसेच ज्ञानदीप गवळी १७ , ऋग्वेद जाधव नाबाद १६ व आरुष रकटे १५ यांच्या फलंदाजीने २४ व्या षटकात सात गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला . नाबाद ५५ व नाबाद ३८ धावांबरोबरच व्यंकटेश बेहरेने पहिल्या डावात १ व दुसऱ्या डावात २ बळी घेत अष्टपैलू कामगिरी करत नाशिकच्या विजयात मोठा वाटा उचलला.
 
तर दुसर्‍या सामन्यात ने नंदुरबार एस एस के क्रिकेट मैदानावर बीडच्या वेंकटेश हुरकुडे ९३, सयद अरशियान ६४ व श्रवण गालफडे ५३ यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३०२ धावा करत बीड च्या ३९ धावांवर २६३ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बीड ला १०० धावांत बाद करत आरामात विजय मिळवला. बीडतर्फे ओम राठोड ने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ बळी घेत विजयात मोठा वाटा उचलला . श्रेयस बडे ने हि ३ व १ गडी बाद केला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी ए ते आय अशा ९ गटात एकूण ३६ संघांमध्ये सदर स्पर्धा रंगत आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती