भारतीय महिला संघाची अनुभवी फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने शुक्रवारी सोशल मीडियावर तिच्या निर्णयाची माहिती दिली. वेदा म्हणाली, 'क्रिकेटने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिले. त्यामुळे मला ओळख मिळाली. आता मी खेळातून निवृत्त होत आहे.'
32 वर्षीय फलंदाजाने लिहिले, 'मोठी स्वप्ने पाहणारी एक लहान शहरातील मुलगी. कदूरच्या शांत रस्त्यांपासून ते अभिमानाने भारतीय जर्सी परिधान करण्यापर्यंत... या खेळाने मला सर्वकाही दिले आहे - आनंद, वेदना, उद्देश आणि कुटुंब. आज मी खेळाला निरोप देते,पण क्रिकेटला नाही. माझे कुटुंब, सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि पडद्यामागील प्रत्येक समर्थकाचे आभार.