पावसाच्या अंदाजादरम्यान, शनिवारी फ्लोरिडामध्ये भारत आणि कॅनडा यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अ गटातील सामना रंगणार आहे. हा भारताचा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना असेल. भारतीय संघ यापूर्वीच सुपर एटसाठी पात्र ठरला आहे. सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आपला वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
शनिवार,15 जून रोजी भारत आणि कॅनडा यांच्यात टी-20 विश्वचषक 2024 चा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल
T20 विश्वचषकासाठी दोन्ही संघ -
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.