BAN vs NED : बांगलादेशने नेदरलँडवर विजय नोंदवला; श्रीलंकेचा प्रवास संपला

शुक्रवार, 14 जून 2024 (08:32 IST)
अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनच्या नाबाद अर्धशतकी खेळीनंतर बांगलादेशने टी-२० विश्वचषकाच्या ड गटातील सामन्यात रिशाद हुसेनच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर नेदरलँड्सचा 25 धावांनी पराभव केला. बांगलादेशचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे. श्रीलंकेचा प्रवास आता संपला असून त्याला पुढे जाणे शक्य नाही. 
 
शाकिबच्या 46 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 64 धावांच्या जोरावर बांगलादेशने 20 षटकांत 5 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून केवळ 134 धावा करू शकला. नेदरलँड्ससाठी सायब्रँड एंजेलब्रेक्टने 22 चेंडूत सर्वाधिक 33 धावा केल्या. बांगलादेशसाठी लेगस्पिनर रिशाद हुसेनने शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 
 
बांगलादेशचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय आहे.सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ ड गटातून पुढील फेरीसाठी पात्र ठरला आहे. बांगलादेशच्या विजयाने श्रीलंका संघाचा प्रवास अधिकृतपणे संपला. या स्पर्धेतून बाहेर पडणारा श्रीलंका हा तिसरा संघ आहे. याआधी ब गटातून नामिबिया आणि ओमानचा प्रवासही ग्रुप स्टेजमध्येच संपला आहे. श्रीलंकेचा तीन सामन्यांतून दोन पराभव आणि एक बरोबरीत एक गुण आहे. या संघाचा एकच सामना शिल्लक आहे आणि श्रीलंकेला हा सामना जिंकण्यात यश आले तरी त्यांचे केवळ तीन गुण होतील, तर बांगलादेश संघाचे चार गुण आहेत.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती