IPL 2025 : आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार, रोहित शर्माला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी

बुधवार, 21 मे 2025 (10:31 IST)
आयपीएल २०२५ च्या ६३ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा एका मोठ्या विक्रमाचे लक्ष्य ठेवेल. इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे एक रोमांचक सामना अपेक्षित आहे.
ALSO READ: MI vs DC : २१ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात व्हर्च्युअल नॉकआउट सामना
तसेच वानखेडे स्टेडियमवर होणारा आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना करा किंवा मरो असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल.
 
आज, हिटमॅन रोहित शर्माला वानखेडेवर एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असेल. मुंबई इंडियन्सला ५ वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहे. षटकार मारण्याच्या बाबतीत तो नेहमीच सर्वात आक्रमक आणि विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानला जातो. यामुळेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीविरुद्ध त्याचे लक्ष्य एक मोठा विक्रम असेल.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती