Viral Video स्वप्नील जोशीचं एक आवाहन!

Webdunia
बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (18:28 IST)
सध्या सर्वत्र महाराष्ट्राच्या लाडक्या अश्या स्वप्नील जोशींचे एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे आणि लोक त्याला प्रतिसाद देत शेअर देखील करत आहे. पण अखेर या व्हिडियो मध्ये आहे तरी काय ?
 
या मध्ये स्वप्नीलने चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी नेहमीच सत्याचाच विजय होतो असे म्हटले आहे. हा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर अकॉउंट वर शेयर केला आहे. हा व्हिडीओ शेयर करताना त्याचा कडून चक्क चूक झाली नंतर त्याने या चुकीची दुरुस्ती देखील केली. 
 
हा व्हिडीओ त्याने वर्ष 2106 जानेवारीचा असल्याचे सांगितले आहे पण जानेवारी 2106 वर्ष हे अद्याप उजाडले नाही. स्वप्निलच्या या ट्विटर पोस्टवर त्याचा चाहत्याने त्याची ही चूक लक्षात आणून दिली त्यांनतर स्वप्नील ने आपल्या चुकेला मान्य करून त्याला #वर्ष 2016 असे म्हणून आपली चूक सुधारली आहे. 
या व्हिडीओ मध्ये त्यानी सध्याच्या काळात देशामध्ये कंगना आणि रियाचे प्रकरणे गाजत असताना, त्यामुळे समर्थकांकडून सत्याचाच विजय होणार असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख