लावणीचा आदर करा -अमृता खानविलकर

Webdunia
रविवार, 4 सप्टेंबर 2022 (14:52 IST)
बीडच्या परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवात अमृता खानविलकर यांना आमंत्रण दिले होते. या वेळी त्यांनी लावणीचा कार्यक्रम सादर केला. गणेशोत्सवात लावणीचा कार्यक्रम ठेल्याच्या कारणामुळे या मंडळाला टीकेच्या सामोरी जावे लागले. अभिनेत्री अमृता खानविलकर यांना हे समजल्यावर त्यांनी टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहेत. त्या म्हणाल्या लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे. लावणीचा वेगळा मान आहे त्याचे वेगळे स्थान आहे. लावणीला खालच्या नजरेने पाहणे पाप आहे. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीला दर्शवणारी लावणीचा आदर करायला शिका आणि लावणीला व्ह्यूज मिळवण्यासाठी ट्रोल करू नका लावणीचा आदर करा. असे त्यांनी लावणी बद्दल टीका करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख