आणि महत्वाचं म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केलं आहे, ज्यांच्या बहुचर्चित मुरांबा या चित्रपटानंतरचा हा पुढील चित्रपट असणार आहे. निपुण आणि वैदेही या कथानकातील जोडपं आयुष्याच्या अगदी तरूणाईच्या म्हणजे साधारण 23 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतं आणि मग या जोडप्याबरोबरच त्यांच्या जवळच्या मंडळींचीही सुरु होते तारेवरची कसरत या सर्व प्रवासात नक्की काय-काय घडणार हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहणं उत्सुकतेच असणारं आहे.