एक दोन तीन चारबद्दल सांगताना चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, “आजच्या तरुणाईला जो चित्रपट आवडेल, चित्रपटाची कथा त्यांना त्यांच्या जवळची वाटेल; असा चित्रपट करण्याची माझी इच्छा होती. कारण लग्न हा असा विषय आहे की तो तुम्ही कुठल्याही वयात करण्याचा निर्णय घेतलात तरी त्यात गुंतागुंत असते आणि इथे तर आजकालच्या तुलनेत, अति लवकर लग्न करण्याचा निर्णय हे जोडपं घेतं. मला खात्री आहे की ही रोलरकोस्टर लव्हस्टोरीसर्वांनाच आपलीशी वाटेल.”
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, बहावा एंटरटेनमेंट आणि16 बाय 64 प्रोडक्शन अंतर्गत, रणजीत गुगळे, केयूर गोडसे, निपूण धर्माधिकारी, निरज बिनीवाले, निर्मित 'एक दोन तीन चार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.