नवऱ्याच्या अपमानाचा बदला कसा घेणार सावी? पाहा, ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (14:34 IST)
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका "पिरतीचा वनवा उरी पेटला" निर्णायक भाग सादर करण्यासाठी सज्ज आहे जो कथेतील एक खोल भावनिक खुलासा करेल. या आगामी भागामध्ये, अर्जुनचं कवठेकरांसोबत रक्ताचं नातं नसल्याचे कळते, ज्यामुळे एक तीव्र कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला आहे. अर्जुन त्याच्या दत्तक असलेल्या वास्तवाचा सामना करतो. जेव्हा कृष्णाई अर्जुनला घर सोडून जाण्यास सांगते तेव्हा त्याचे जग हादरते. घरच्यांनी अर्जुनसोबत केलेली वागणुक आणि नाकारल्याबद्दल सावीचा संताप होतो. आता सावी कवठेकरांना कसा धडा शिकवणार? या संकटाच्या आणि संघर्षाच्या क्षणी सावी कशी सावरेल अर्जुनला? ते पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख