केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यासाठी खुशखबर

बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (10:48 IST)
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महागाई भत्ता आता ४ टक्क्यांवरून ५ टक्के होणार आहे. १ जुलैपासून हा भत्ता लागू करण्यात येणार आहे. याचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना लाभ होणार आहे.
 
मूळ वेतन आणि पेन्शनवर १ टक्का भत्ता वाढवण्यात आला आहे. महागाई भत्त्यातील अतिरिक्त वाढ ही सध्याच्या ४ टक्क्यांवरून १ टक्का अधिक म्हणजे ५ टक्के इतकी करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्याच्या आधारावर ही वाढ करण्यात आली आहे.  चालू वित्तीय वर्षाच्या आठ महिन्यांच्या (जुलै २०१७ ते फेब्रुवारी २०१८) या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भरपाई यामुळे सरकारी तिजोरीवर अनुक्रमे ३,०६८.२६ व २,०४५.५० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती