तामिळनाडूमधल्या चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) विस्टाडोम बोगी तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्यटकांना निसर्गसौंदर्य, दरी, घाट यांचे निरीक्षण करण्यासाठी ‘आॅब्जर्वेशन लाउंज’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या लाउंजमधून पर्यटकांना विहंगम दृश्याचा अनुभव घेता येणार आहे.
विस्टाडोम बोगीत ४० इतकी आसनव्यवस्था पूशबॅक आणि रोटेड (१८० अंश कोनात फिरणारे) स्वरूपातील आहे. या आसनव्यवस्थेमुळे देशी-विदेशी पर्यटकांना या कोचचे विशेष आकर्षण आहे. या बोगीचे दरवाजे स्वयंचलित आहेत. शिवाय या बोगीत जीपीएस यंत्रणा, १२ एलसीडी लाइट, एक लहान आकाराचा फ्रीज, ओव्हन, ज्यूसर ग्राइंडर अशादेखील सुविधा असणार आहेत. आधुनिक बनावटीचे स्वच्छ स्वच्छतागृह हेदेखील विस्टाडोमचे वैशिष्ट्य आहे. विशाखापट्टणम ते आरकू या हिल स्टेशनवर अशा प्रकारच्या बोगी धावत आहेत.