चेहऱ्या वर येईल मेकअप न करता चकाकी, डाग देखील दूर होतील हे टिप्स अवलंबवा.

बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
चेहऱ्याची चकाकी कमी झाल्यावर मुली अस्वस्थ होतात. प्रत्येक महिला तिचा चेहरा डाग विरहित, नितळ आणि चकचकीत बनून राहावं अशी इच्छा बाळगते. परंतु धूळ, माती आणि वाढत्या प्रदूषणामुळे  चेहऱ्याची चकाकी टिकवून ठेवणे कठीण आहे. जर आपण देखील आपल्या चेहऱ्याची चकाकी परत मिळवू इच्छिता तर हे  ब्युटी टिप्स अवलंबवा  
 
 1 बटाटा -
बटाट्याचा वापर केल्यामुळे त्वचेतील  काळे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिगची समस्या दूर होते. जर आपल्या त्वचे मधून तजेलपणा देखील नाहीसा झाला आहे. तर बटाट्याचे हे मास्क कामी येतात.
 
कसं वापरावं -
कच्चा बटाटा किसून चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे वापरा. दुसऱ्या दिवशी कच्चं दूध लावा. असं केल्यानं त्वचेचे डाग फिकट होतात. किसलेली काकडी लावल्यानं काकडी त्वचेची क्लिंझिंग आणि टोनिंग करतो. या मुळे त्वचा चकाकते.
 
2 नारळ पाणी -
 
त्वचेचे डाग दूर करण्यासाठी नारळपाणी खूप प्रभावी आहे. नारळ पाण्यात एक चमचा मध मिसळा आणि आईस ट्रे मध्ये जमवून घ्या. दररोज एक खडा घेऊन चेहऱ्यावर हळुवार पणे चोळा. 10 मिनिटा नंतर पाण्याने धुऊन घ्या.नारळ पाण्यात केरोटीन असते जे मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला नवी चकाकी देते.
 
3 नारळाचं तेल आणि कापूर-
त्वचेवर मुरूम आणि पुरळ धूळ, माती आणि प्रदूषणामुळे उद्भवतात. नारळाच्या तेलात कापूर मिसळा आणि ढवळा. हळुवार हाताने मॉलिश करत चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटानंतर चेहरा धुऊन घ्या. डाग दूर करण्यासाठी कच्च्या दुधाने स्वच्छ करा.एक दिवसा आड किमान एक महिना हा उपाय करून बघा.
 
4 मलई आणि हळद- 
एक चमचा हळद आणि 1/4 चमचा गुलाब पाणी एक चमचा सायीमध्ये मिसळून चेहऱ्यावर हळुवार हाताने चोळा.20 मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. हे दररोज दोन महिने केल्यानं चेहरा उजळेल आणि डाग नाहीसे होतील.
 
5 टोमॅटो -
टोमॅटोमध्ये अँटी ऑक्सीडेन्ट असतात, जे त्वचेला पोषण देतात. टोमॅटो मधून कापून चेहऱ्यावर हळुवारपणे चोळा. 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि मॉइश्चरायझर लावा.हे उपाय केल्यानं चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतील आणि चेहरा उजळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती