कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची घाला. आता हळूहळू पाणी घालून घट्ट सर मिश्रण फेटून घ्या. आता नॉन-स्टिक तवा गरम करा, त्याला थोडे तेल लावा. आता मोठ्या चमच्याने बॅटर तव्यावर पसरवा. व मध्यम आचेवर १-२ मिनिटे भाजा, वरून तेल किंवा तूप लावा. उलटून दुसऱ्या बाजूला खरपूस भाजून घ्या. तर चला तयार आहे आपला झटपट नाश्ता तांदळाचे घावन, खोबऱ्याची चटणी सोबत नक्कीच ट्राय करा.