हेयर कलर आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते अशी खबरदारी घ्या

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:43 IST)
आपण बऱ्याच वेळ उन्हात राहिल्यावर कधी असं झाले आहेत का की त्वचेवर लाल पुरळ आले आहेत. जर हो, तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला सूर्यप्रकाशापासून ऍलर्जीची समस्या आहे. ही त्वचा संवेदनशील त्वचा असणाऱ्यांना अधिक होते. सूर्यप्रकाशा शिवाय अनेक क्रीम,लोशन आणि हेयर कलर देखील त्वचेच्या ऍलर्जी साठी जबाबदार असतात. चला तर मग जाणून घेऊ या त्वचेची  ऍलर्जी झाल्यावर कोणती  खबरदारी घेऊ शकता. 
 
* त्वचेची  ऍलर्जी होण्याचा अर्थ आहे की त्वचे मध्ये सूज येणं,लाल पुरळ होणं ,दाणे होणं. ही समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञाचा विश्वास आहे की त्वचेच्या संसर्गाचे कारण हेयर कलर आणि सूर्य प्रकाश होऊ शकतो. हेयर कलर मध्ये अनेक प्रकारचे रसायन असतात. ज्यामुळे अनेक प्रकारची प्रतिक्रिया होऊ शकते. म्हणून कधीही हेयर कलर लावल्यावर कपाळी,कान किंवा मानेच्या मागच्या भागाला सूज जाणवल्यास, डोळ्यात जळजळ जाणवू लागत असल्यास त्वरितच डॉक्टर कडे जावं.
 
* खबरदारी घ्या-
 
* केसांच्या रंगामुळे होणाऱ्या त्वचेची ऍलर्जी टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. 
 
* कमी पैशाच्या अभावी असे कोणतेही ब्रँड वापरू नका ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.
 
* जर आपण कोणत्याही ब्रँडचे हेयर कलर वापरत आहात तर त्या बद्दल त्याची माहिती मिळवा. सौंदर्य तज्ज्ञांच्या मतानुसार बऱ्याच वेळा वेग वेगळे ब्रँड चे हेयर कलर वापरून देखील काही लोकांना ऍलर्जी होते.म्हणून केसांसाठी एकाच ब्रँड चे हेयर कलर वापरणे चांगले आहे. 
 
* नेहमी कोणतेही हेयर कलर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे सुरक्षित आहे.असं केल्यानं हे लक्षात येत की आपली त्वचा उत्पादनासाठी किती संवेदनशील आहे.
 
* हेयर कलर जास्त काळ लावून ठेवू नका. हे हानिकारक होऊ शकत.
 
* वापरण्यापूर्वी त्यावरील निर्देश आवर्जून वाचा. तसेच त्यावरील समाप्तीची तारीख देखील तपासून बघा.
 
*  कोणते ही दोन ब्रँडचे हेयर कलर एकत्र मिसळून लावू नका.
 
त्वचेचे तज्ज्ञ सांगतात,की हेयर कलरच्या व्यतिरिक्त काही लोकांना सूर्यप्रकाशाची ऍलर्जी देखील होऊ शकते, तर त्यांना उन्हात नेहमी सनग्लासेस,सनस्क्रीन,लावून आपल्या त्वचेला झाकून बाहेर पडले पाहिजे आणि थेट सूर्याच्या संपर्कात जास्त काळ येण्यापासून वाचले पाहिजे. तसेच स्वतःला हायड्रेट ठेवणं देखील महत्त्वाचे आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती