हे 5 होममेड स्क्रब लावा फेशियल करण्याची गरज नाही

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (16:50 IST)
जर आपण खूपच  व्यस्त असता आपल्याकडे पार्लरला जाऊन फेशियल करण्याचा वेळ देखील नाही तर हे काही नैसर्गिक स्क्रब लावा, हे लावल्यावर आपल्याला फेशियल करण्याची गरज भासणार नाही. आणि हे स्क्रब बनविण्यासाठी आपल्याला बाहेरून काहीच आणायचे नाही. हे सर्व साहित्य आपल्या घरातच मिळतील. चला तर मग जाणून घेऊ या हे स्क्रब कसे आणि कशा पासून तयार करता येतील.
 
1 मोहरी आणि दह्याने बनवा फेस स्क्रब-
मोहरी ही प्रत्येक प्रकाराने फायदेशीर आहे. खाण्याची चव वाढविण्यासह मोहरीचे तेल मॉलिश साठी उपयुक्त आहे. मोहरीचे स्क्रब तयार करण्यासाठी मोहरीमध्ये दही, मध आणि गव्हाचं पीठ मिसळून पेस्ट तयार करा आणि हळुवारपणे स्क्रब करा.
 
2 तीळ आणि हळद  स्क्रब -
पौष्टिक तीळ आणि अँटिसेप्टिक गुणधर्माने समृद्ध असलेल्या हळदी पासून एक उत्कृष्ट स्क्रब तयार करू शकता. हे बनविण्यासाठी 1 चमचा तिळाच्या तेलात 1 /2 चमचा हळद आणि थोड्या प्रमाणात तीळ घालून स्क्रब तयार करा. हे मिश्रण शरीरावर हळुवार हाताने चोळा. आठवड्यातून एकदा हे केल्याने त्वचेचा रंग उजळेल.
 
3 कॉफी आणि नारळाच्या तेलाचे स्क्रब- 
सकाळी घेतलेली एक कप कॉफी केवळ ताजेतवानचं करत नाही तर त्या कॉफीचे बियाणे सौंदर्य वाढवतात. या साठी कॉफीचे बियाणे वाटून घ्या. या मध्ये साखर आणि नारळाचं तेल मिसळून मिश्रण तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर स्क्रब करा.    
 
4 खसखस आणि मिठाचे स्क्रब-
खसखसीच्या काळ्या किंवा पांढऱ्या बियाणांपासून चांगला स्क्रब तयार करता येतो. या साठी ह्याच्या बियाणांमध्ये मीठ किंवा साखर मिसळून पेस्ट तयार करा. जेव्हा देखील शरीराला स्क्रब करावयाचे असेल या पेस्ट ला वापरा.
 
5 अळशी आणि मधाचे स्क्रब -
 
अळशी च्या बियाणांपासून बनविले स्क्रब देखील चांगले आहे. हे बनविण्यासाठी अर्धा कप अळशीच्या बियाणांमध्ये 3 चमचे मध आणि थोडे दूध-पाणी मिसळून स्क्रब तयार करा. हे स्क्रब चेहऱ्यावर आणि शरीरावर लावून मॉलिश करा. या मुळे चेहऱ्यावर चकाकी येईल. आणि आपले सौंदर्य वाढेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती