मॉइश्चरायझर हे त्वचे ला मऊ आणि कोमल बनवत.मॉइश्चराइझरचा वापर केल्यानं सर्व आवश्यक असलेल्या घटकांची पूर्णता होते.त्वचा चकचकीत राहण्यासाठी त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या साठी चांगल्या प्रतीचे आणि गुणवत्तेचे मॉइश्चरायझर वापरावे. मॉइश्चरायझर वापरणे त्वचा चांगली ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. मॉइश्चरायझर कोणते वापरायचे या साठी काही टिप्स सांगत आहोत.
* फेसवॉश प्रमाणेच मॉइश्चरायझरची निवड आपल्या त्वचेवर करा.
* त्वचा कोरडी असेल, तर असं मॉइश्चरायझर निवडा ज्यामध्ये सोया,बटर,कोकोबटर आणि ऑलिव्ह ऑइल असेल.
* चेहऱ्यावरील टीझोन भागावर व्यवस्थितरीत्या मॉइश्चरायझर लावा.
* चेहऱ्यासह हात-पायांना देखील मॉइश्चरायझर लावा.
* ओठांना मऊ बनविण्यासाठी दररोज 3 ते 4 वेळा ओठांना लिप बाम लावा.
* ओठांना जीभ लावू नका. या मुळे ओठांची त्वचा रुक्ष राहते.