त्वचेचे सौंदर्य टिकवून राखण्यासाठी या उपायांना अवलंबवा

सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (17:55 IST)
त्वचेला स्वच्छ ठेवण्यासाठी त्याची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. ज्या प्रमाणे आपण शरीराला स्वच्छ ठेवता त्याच प्रमाणे त्वचेची स्वच्छता करणं देखील आवश्यक आहे.लोक आपल्या त्वचेला स्वच्छ ठेवण्यासाठी महागड्या क्लिंझरचा वापर करतात. परंतु हे क्लिन्झर सर्व महिला आणि पुरुषांच्या त्वचे ला सहन होणार की नाही या बद्दल संभ्रमितच असतात. 
आपण देखील या महागड्या उत्पादनाचा वापर न करता आपल्या त्वचेला काही घरगुती क्लिन्झर वापरून स्वच्छ करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या अशा क्लिन्झर बद्दल जे आपल्या त्वचेला निरोगी ठेवू शकतात.
 
1 टोमॅटो -
जेव्हा गोष्ट त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांची असते, अशा परिस्थितीत टोमॅटो प्रथम स्थान वर येतो. त्वचेला स्वच्छ करण्यासाठी आपण अर्धा टोमॅटो त्वचेवर घासा, टोमॅटो त्वचेला स्वच्छ करण्यात मदत करतो.
 
2 मुलतानी माती- 
मुलतानी माती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली आहे. जर आपली त्वचा तेलकट आहे, तर आपण मुलतानी मातीने बनलेले पेस्ट सहज वापरू शकता. जे आपल्या त्वचेला नैसर्गिकरीत्या स्वच्छ करण्यात मदत करू शकतात.
 
३पपई -
आपण निरोगी राहण्यासाठी पपईचा वापर आहारात करतो, पपई ही त्वचेसाठी देखील चांगली मानली आहे. पपई हे दुधात आणि ओटमील मध्ये मॅश करून त्वचेवर चोळल्यानं त्वचेला स्वच्छ करतात.
 
4 हरभराडाळीचे पीठ -
तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी दह्यासह हरभराडाळीचे पीठ मिसळून मसाज करा.दही आणि हरभराडाळीचे पीठ चेहऱ्यावर देखील लावू शकता. या मुळे त्वचा चकचकीत आणि स्वच्छ राहते.
 
5 दही - तेलकट त्वचेसाठी दही हे चांगले पर्याय आहे, दोन-तीन लहान चमचे दह्याने दररोज दिवस अखेरीस मसाज करा आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. हे आपली त्वचा स्वच्छ ठेवण्यात मदत करते.
 
6 स्ट्राबेरी -
स्ट्राबेरी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानली आहे. परंतु आपल्याला माहीत आहे की हे त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. या मध्ये व्हिटॅमिन सी आढळते. जे त्वचेसाठी चांगले मानले आहे. स्ट्राबेरी चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा स्वच्छ आणि चकचकीत होते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती