शरद पवार राष्टवादीची पडझड सावरणार, राज्य दौरा लवकरच

Webdunia
शनिवार, 14 सप्टेंबर 2019 (16:09 IST)
पक्षातील दिग्गज नेते, आमदार व खासदार पक्षांतर करत असल्यामुळे संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. मंगळवारपासून (१७ सप्टेंबर) शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरूवात सोलापुरातून होणार आहे. भाजप-शिवसेनेकडे जाणाऱ्या नेते- पदाधिकाऱ्यांना थोपवणे व पक्षात अजूनही असलेल्यांना विश्वास देणे हाच या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
शरद पवार यांच्या दौऱ्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याला मंगळवारी सुरूवात होत आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
 

संबंधित माहिती

पुढील लेख