निवडणूक आयोगाची बैठक होत असून, बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत सोबतच तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा ,झारखंडचा समावेश केला असून, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. त्यामुळे आता लवकरच उत्सुकता संपणार असून, निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.