घरावर कोसळलं विमान, दोन जण ठार VIDEO

Webdunia
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (16:43 IST)
Plane Crash in California अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सोमवारी विमान कोसळून किमान दोन जण ठार झाले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. अधिकाऱ्यांच्या मते, अपघातामुळे दोन घरांनाही आग लागली.
 
"विमान सैन डिएगोच्या 20 मैल (30 किलोमीटर) ईशान्येस सँटीमध्ये दुपारच्या सुमारास कोसळले," असे अग्निशमन विभागाचे उपप्रमुख जस्टिन मत्सुशिता यांनी सांगितले. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, अपघातामुळे आगीत दोन घरे आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन प्रमुख जॉन गार्लो यांनी सांगितले की, दोन जण जळाले आहेत. या आगीत एक घर जळून खाक झाले तर दुसऱ्या घरालाही आग लागली. या आगीत माल घेऊन जाणाऱ्या ट्रकचेही नुकसान झाले आहे.
 

संबंधित माहिती

पुढील लेख