Bangladesh Protests:ढाका येथे पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी निर्दशने

शनिवार, 10 डिसेंबर 2022 (22:35 IST)
बांगलादेशात शनिवारी सकाळीच सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली. विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो लोक सहभागी होत आहेत. बांगलादेशच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सय्यदाबाद, ढाका येथील गोपाल बाग मैदान गर्दीने खचाखच भरले होते. हे लोक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने करत आहेत. बांगलादेशात तात्काळ निवडणुका जाहीर कराव्यात, अशी बीएनपीची मागणी आहे.

हसीना सरकारने या निदर्शनांवर निर्बंध लादले असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र येणे ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे. दरम्यान, आंदोलनादरम्यानच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) च्या सात खासदारांनी राजीनामे जाहीर केले. 
 
काय आहे बीएनपीची मागणी?
सत्ताधारी अवामी लीगऐवजी काळजीवाहू सरकारच्या अंतर्गत नव्या निवडणुका घेण्यासाठी बीएनपी पंतप्रधान हसिना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. शेख हसीना प्रशासन निवडणुकीत हेराफेरी करत असल्याचा संशय पक्षाने व्यक्त केला आहे. बांगलादेशात पुढील सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत.
 
तत्पूर्वी, बीएनपीच्या ढाका रॅलीपूर्वी पोलिसांनी आंदोलक पक्षाच्या कार्यकर्त्यांशी झटापट केली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. दोन दिवसांनी बीएनपीच्या नेत्यांनाही अटक करण्यात आली.
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती