शुक्रवारी टायर फुटल्याने काठमांडूहून नवी दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 216 रद्द करण्यात आले. फ्लाइटमध्ये 173 लोक होते, ज्यात 164 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते. टायर पंक्चर झाल्याची घटना टेक ऑफ करण्यापूर्वी घडली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. हे विमान काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता नवी दिल्लीसाठी रवाना होणार होते. तेव्हाच एअर इंडियाच्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने टायर पंक्चर झाल्याची माहिती दिली. विमानाला धावपट्टीवरून एका पार्किंग एरियाकडे नेण्यात आले. आवश्यक देखभालीचे काम आणि पुनर्नियोजन केल्यानंतर हे विमान आता शनिवारी रवाना होईल.