महाराष्ट्रातील कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर, भाऊबीजच्या अगदी आधी झालेल्या भीषण रस्ते अपघाताने एका कुटुंबाच्या दिवाळीच्या उत्सवाचे दुःखात रूपांतर केले. मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कौलव गावाजवळ एका भरधाव टेम्पोने मोटारसायकलला धडक दिली. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एका १० वर्षांच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत कांबळे त्याची बहीण दीपाली गुरुनाथ कांबळे आणि श्रीकांतची तीन वर्षांची भाची शिवज्ञान यांचा मृत्यू झाला आहे. तसेच दीपालीचा १० वर्षांचा मुलगा अथर्व याची प्रकृती गंभीर आहे. व त्याच्यावर कोल्हापूरच्या रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदत केली आणि जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, रुग्णवाहिका उशिरा आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, ज्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला.