नासिरिया शहरातील या रुग्णालयात कमीतकमी 50 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती चिंताजनक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मरण पावलेली माणसे अतिशय वाईट अवस्थेत होरपळली आहेत .ते म्हणाले की ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागली. ऑक्सिजन सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचे आणखी एका अधिकऱ्याने सांगितले.
आरोग्य विभागाचे प्रवक्तेने सांगितले की, आगलागली त्यावेळी किमान 63 रुग्ण वॉर्डच्या आत होते. इराकमधील रुग्णालयात यंदा आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये बगदादमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक फुटल्याने कमीतकमी 82 लोक ठार झाले होते.
प्राथमिक पोलिस अहवालात असे सांगितले गेले आहे की, रुग्णालयाच्या कोविड 19 प्रभागात ऑक्सिजन टँक फुटल्याने ही आग लागली. हॉस्पिटलच्या गार्डने सांगितले की कोविड वॉर्डच्या आत मला मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्यानंतर आग खूप वेगाने पसरली.