मेहुल चोकसीला डोमिनिका कोर्टाकडून जामीन,मेडिकल कंडिशनच्या आधारे दिलासा

सोमवार, 12 जुलै 2021 (21:35 IST)
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी फरारी उद्योजक मेहुल चोकसी याला डोमिनिका उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.वैद्यकीय कारणास्तव अँटिगा येथे जाण्यासाठी त्याला जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने दिलेला हा संयुक्त संमतीचा आदेश आहे.
 
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान झूमच्या माध्यमातून मेहुल चोकसी रुग्णालयाच्या बेडवरून हजर झाले.चोकसी यांच्या कायदेशीर संघाचे नेतृत्व ज्येष्ठ त्रिनिदादियन वकील डग्लस मेंडिस करीतआहेत. इतर वकीलांमध्ये जेना मूर डायर, ज्युलियन प्रीव्हॉस्ट, जीना डायर मुनरो, वेन नॉर्डे आणि काराशिलिंगफोर्ड मार्श यांचा समावेश आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती