Tatya Tope Information: भारत भूमीला अनेक देशभक्त मिळाले. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली. भारत देश आज देखील सर्व देशभक्त आणि क्रांतिकारी, महानायकांचा ऋणी आहे. अश्याच एक महान क्रांतिकारी पैकी एक होते तात्या टोपे. १८५७ च्या क्रांतीचे महाननायक, क्रांतिकारी आणि देशभक्त सेनापती, शहीद तात्या टोपे यांना १९५९ मध्ये फाशी देण्यात आली. तात्या टोपे हे ब्रिटिशांना सर्वात जास्त सळोकीपळो करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. ब्रिटिश त्यांना इतके घाबरायचे की त्यांनी तात्या टोपेंना पकडल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी म्हणजे १८५९ रोजी फाशी दिली.
तात्या टोपे यांचे पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे होते. त्यांचा जन्म १८१४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथील येवला येथे एका मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील पांडुरंगराव टोपे हे पेशवे बाजीराव द्वितीय यांच्या दरबारात एक महत्त्वाचे अधिकारी होते. तसेच त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई होते. तात्या टोपेंना मराठी आणि संस्कृत व्यतिरिक्त, युद्धकला देखील शिकवली गेली.
तात्या टोपे हे पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र नाना साहेब यांचे जवळचे मित्र आणि सहकारी होते. नाना साहेबांशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि ते त्यांचे विश्वासू बनले. नाना साहेबांसोबतच त्यांनी गनिमी कावाची कला शिकली. या कलेच्या बळावर, ते १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक बनले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध भारतीय सैनिक आणि नागरिकांचा बंड ब्रिटिशांनी चिरडून टाकला, परंतु तात्या टोपे यांनी गनिमी युद्धाद्वारे तो जिवंत ठेवला. तसेच तात्या टोपे यांनी कानपूरमध्ये ब्रिटीश सैन्याविरुद्धच्या युद्धाचे नेतृत्व केले. कानपूर काबीज करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक वेळा ब्रिटीश सैन्याचा पराभव केला. ते गनिमी युद्धाच्या रणनीतींसाठी प्रसिद्ध होते. ते पटकन जागा बदलायचे आणि त्यांच्या युक्तीने ब्रिटीश सैन्याला गोंधळात टाकायचे. राणी लक्ष्मीबाईंसोबत त्यांनी झाशी आणि ग्वाल्हेरमध्ये ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढा दिला. ग्वाल्हेरचा ताबा हा त्याच्या महान कामगिरींपैकी एक होता.
एप्रिल १८५९ मध्ये, तात्या टोपे यांचे सहकारी मान सिंग यांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांच्या स्थानाची माहिती ब्रिटिश सैन्याला दिली. १८५९ रोजी तात्या टोपे यांना ब्रिटीश सैन्याने मध्यप्रदेशमधील शिवपुरी येथे पकडले आणि १८५९ रोजी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना दीर्घ खटल्याशिवाय फाशी दिली. या महाननायक, क्रांतिकारी आणि देशभक्त सेनापती शहीद तात्या टोपे यांचे आज देखील स्मरण केले जाते. त्यांची देशभक्ती ही अद्भुत होती.