Uttarakhand Election 2022 उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केली दुसरी यादी, जाणून घ्या कोणाला मिळाले तिकीट?

Webdunia
गुरूवार, 27 जानेवारी 2022 (10:06 IST)
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहे. त्याचवेळी भाजपने विधानसभा निवडणुकीसंदर्भात दुसरी यादीही जाहीर केली आहे. उत्तराखंडसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत नऊ उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. उत्तराखंडमधील भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कोटद्वारमधून माजी मुख्यमंत्री बीसी खंडुरी यांची कन्या रितू भूषण खंडुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
दुसऱ्या यादीत नाव जाहीर
कोटद्वार - ऋतुभूषण खंडुरी
केदारनाथ - शैला राणी रावत
झाब्रेडा - राजपाल सिंग
पिरंकलियार - मुनीश सैनी
राणीखेत - प्रमोद नैनवाल
जागेश्वर - मोहनसिंग मेहरा
लालकुना - मोहनसिंग बिश्त
या यादीनंतर भाजपने आता डोईवाला आणि टिहरी जागा वगळता सर्व जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. माजी मुख्यमंत्री बी.सी.खंडुरी यांच्या कन्या रितू खंडुरी यांना यावेळी यमकेश्वरऐवजी कोटद्वारमधून तिकीट देण्यात आले आहे. यापूर्वी भाजपने उत्तराखंड निवडणुकीसाठी 59 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पुन्हा एकदा खतिमा मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांना हरिद्वार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख